लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर दरमहा 1500 रुपये याप्रमाणे 5 महिन्यांचे हफ्ते देण्यात आले आहेत.
लवकरच लाडक्या बहिनींच्या खात्यात 6व्या हफ्त्याचे 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत.
महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील लाडक्या भगिनींच्या आधार लिंक बँक खात्यात 1500₹ ऐवजी 2100 रुपये लवकरच जमा होणार आहेत.
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे.
त्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
त्यानंतर 2 दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याचे 2100 रुपये जमा होतील.