CM Mazi Ladki Bahin Yojana: हे आहेत बदललेले पाच नियम

1. विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल.

2. परराज्यात जन्म झालेल्या महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल. तसेच, महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व मतदानकार्डही ग्राह्य असेल.

3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.

4. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

5. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

🔴 'माझी लाडकी बहीण' योजनेत 13 जुलै रोजी झालेले नवीन बदल,🔉 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇.