एटीएम कार्डशिवाय काढा पैसे, एसबीआय डेबिट कार्ड बंद! आता UPI द्वारे ATM मधून काढा पैसे Withdraw Cash Without Atm Card Sbi

2 Min Read
Withdraw Cash Without Atm Card Sbi Upi

Withdraw Cash Without Atm Card Sbi : एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज नाही आणि आता लवकरच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कार्डचीही गरज भासणार नाही. आता तुम्ही तुमच्या फोनवरून कोणत्याही कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. (Withdraw cash from SBI ATMs without a debit card using UPI apps like Google Pay, BHIM, and Paytm. Learn the secure steps for cardless cash withdrawal via QR code scanning).

QR कोडद्वारे एटीएम मधून पैसे काढा

अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा आधीच दिली आहे, आता तुम्ही भारतीय स्टेट बँक एटीएम (SBI ATM) मधून देखील कार्डशिवाय पैसे काढू शकता. यासाठी फक्त तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, ज्यातून तुम्ही UPI द्वारे पैसे काढू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

एटीएम मधून कार्डशिवाय पैसे कसे काढायचे?

  • 1: एटीएमवर जा स्क्रीनवर दोन पर्याय दिसतील – UPI आणि Cash.
  • 2: त्यातील UPI पर्याय निवडा.
  • 3: किती रक्कम काढायची आहे, ती रक्कम टाका.
  • 4: यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर एक QR कोड दिसेल.
  • 5: तुमच्या फोनमधील BHIM, Paytm, Google Pay, PhonePe सारख्या कोणत्याही UPI ॲपवरून तो QR कोड स्कॅन करा.
  • 6: स्कॅन केल्यानंतर बँक निवडा आणी तुमचा UPI पिन टाका.
  • 7: यशस्वी पेमेंटचा संदेश येईल आणि एटीएम स्क्रीनवर “Continue” बटण दिसेल.
  • 8: “Continue” वर क्लिक करताच तुम्हाला एटीएम मधून जितके पैसे हवे होते तितके पैसे बाहेर येतील.

एटीएम कार्डमधून पैसे काढणे सुरक्षित असले तरी हल्ली कार्ड स्किमिंग आणि कार्ड क्लोनिंगसारख्या फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. कार्डशिवाय पैसे काढून या प्रकारची फसवणूक टाळता येऊ शकते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article