महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी Women Empowerment Schemes Maharashtra 2025

2 Min Read
Women Empowerment Schemes Maharashtra 2025

Women Empowerment Schemes Maharashtra 2025: महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. याच उद्देशाने महाराष्ट्रात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘लेक लाडकी योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ आणि ‘पिंक ई-रिक्षा योजना’ यासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. (The Maharashtra state government has launched significant schemes to empower women in various sectors. Learn about the ‘Majhi Ladki Bahin Yojana’, ‘Lek Ladki Yojana, ‘Pink E Rickshaw Yojana’, and other programs aimed at women’s educational, social, and economic development).

राज्याचे महिला धोरण:


महाराष्ट्र राज्याने ७ मार्च २०२४ रोजी “चौथे महिला धोरण-२०२४” जाहीर केले आहे. या धोरणाद्वारे महिलांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, कौशल्य विकास, आणि लिंग समानतेसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या धोरणामुळे महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साधण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:


या योजनेद्वारे २१ ते ६५ वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात पाठवले जात आहेत. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत आहे.

पिंक ई-रिक्षा योजना:


महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेत एकल महिला, विधवा आणि परित्यक्त महिलांना प्राथमिकता दिली जात आहे.

महिला आयोग आपल्या दारी:


महिला आयोग ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे महिलांना जलद न्याय प्रदान करत आहे.

लेक लाडकी योजना:


या योजनेत मुलीच्या जन्मानंतर, शालेय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याप्रमाणे, एक मुलगी पात्र ठरल्यास तिला एकूण १ लाख १ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

मातृशक्तीचा सन्मान:


महाराष्ट्र सरकारने मुलांच्या नावाच्या पुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मातृशक्तीचा सन्मान होईल आणि महिलांचा सन्मान वाढेल.

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी नव-तेजस्विनी योजना:


नव-तेजस्विनी योजना (Nav Tejaswini Yojana) या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते. महिलांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now