Majhi Ladki Bahin Yojana 2100 Rs Kadhi Yenar: महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेच्या माध्यमातून महिलांना सध्या दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांमध्ये वाढ होईल का? लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने जाहीर केले होते की, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना २१०० रुपये दिले जातील, मात्र त्याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. (Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries will continue to receive 1500 Rs until the budget session in March 2025. Learn when the 2100 Rs increase will happen as per Aditi Tatkare latest update).
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी नुकतच याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) हफ्त्यात वाढ करण्याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल. ३ मार्च २०२५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, अर्थसंकल्पात योजनेसाठी १५०० रुपयांवरून २१०० रुपयांची वाढ करण्याची तरतूद केली जाईल. अस अदिती तटकरे म्हणाल्या.
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल की, या आर्थिक वाढीच्या निर्णयासाठी आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार नवीन अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करेल. त्यामुळे, १५०० रुपयांचे मानधन २१०० रुपये होण्यासाठी महिलांना मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
त्यामुळे लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्या पर्यंत १५०० रुपयेच मिळणार आहेत, आणि मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ही रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! ‘या’ महिलांना जानेवारी महिन्यापासून मिळणार नाही योजनेचा लाभ!.