लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! ‘या’ महिलांना जानेवारी महिन्यापासून मिळणार नाही योजनेचा लाभ! Majhi Ladki Bahin Yojana Update Today 3 January 2025

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Update Today 3 January 2025

Majhi Ladki Bahin Yojana Update Today 3 January 2025: महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, योजनेच्या पात्रतेसाठी आजपासून अर्जांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. काही महिलांना पुढच्या महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Stay updated on Majhi Ladki Bahin Yojana. Women with annual family income above ₹2.5 lakh won’t receive benefits. Learn about the eligibility criteria, upcoming changes, and Maharashtra government’s decisions).

अर्जांची फेरतपासणी सुरू


माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) पात्र असणाऱ्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू झाली असून त्यात काही महत्त्वाचे निकष तपासले जाणार आहेत. सरकारी नोकरी असलेल्या महिलांना, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर सरकारी नोकरी असल्यास किंवा ज्या महिलांना पेन्शन मिळते, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन किंवा महिलेच्या नावावर दुचाकी वाहन असल्यास, लाभार्थी महिला परराज्यात स्थायिक असल्यास अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष:

  1. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  2. घरातील कोणत्याही सदस्याचे नाव सरकारी नोकरीत नसावे.
  3. महिलांना पेन्शन मिळत असल्यास त्या अपात्र ठरतील.
  4. महिलांच्या कुटुंबातील कोणी आमदार किंवा खासदार असल्यास त्या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  5. घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी किंवा महिलेच्या नावावर दुचाकी असल्यास अशा महिला अपात्र ठरतील.
  6. महाराष्ट्रात जन्मलेल्या पण इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिला अपात्र ठरतील.

🔴 यात तुमचं नाव तर नाही? 👉 या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये, यात तुमच नाव आहे का? तपासा.

महत्त्वाची माहिती


महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, इथून पुढे योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळेल. काही महिलांनी स्वतःच त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी केली आहे, कारण त्यांचा आधार नंबर चुकीचा आहे किंवा परराज्यात स्थलांतरामुळे त्या योजनेसाठी पात्र नाहीत.

योजनेबाबतच्या अफवा खोट्या ठरल्या


विधानसभा निवडणुकीनंतर माझी लाडकी बहीण योजना बंद होईल, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना सुरूच राहील. तसेच लवकरच महिलांना योजनेचा २१०० रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद केली जाणार आहे.

सरकारची भूमिका आणि अपेक्षित बदल


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खर्च मोठा असून, सरकार यासाठी ४६,००० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे. पात्रतेच्या कठोर निकषांमुळे, या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

माझी लाडकी बहीण योजनेत (Mazi Ladki Bahin Yojana) पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने फेरतपासणीचा निर्णय घेतला आहे. अपात्र महिलांना पुढील महिन्यापासून लाभ मिळणार नसल्यामुळे पात्र महिलांच्या रक्कम वाढीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 Gold Price Today: आज 3 जानेवारी 2025 रोजीचा सोन्याचा भाव येथे जाणून घ्या.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now