मोठी अपडेट! या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होणार 7500 रुपये Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही अद्याप खात्यात पॆसे जमा झाले नसलेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे तक्रार दाखल करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. (Women approved for Majhi Ladki Bahin Yojana but haven’t received payments yet will get ₹7500 for 5 months deposited in their bank accounts by October 10, 2024).

महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली आणी त्यानंतर लगेचच अर्ज प्रक्रिया सुरु झाली आणी काही काळातच अर्जदार महिलांची संख्या एक कोटीच्या घरात गेली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन टप्प्यात लाभ हस्तांतरण करण्यात आले असून. दरम्यान जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर (Approve) होऊनही काही महिलांच्या खात्यात अजून एकदाही पैसे जमाच झाले नाहीत. तर अशा महिलांना लवकरात लवकर लाभ वितरित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येत्या 8 ऑगस्ट पर्यंत महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे त्यांची तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानुसार नेमण्यात आलेल्या समितीमार्फत अशा महिलांच्या नावाची यादी बालविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. आणी त्यानंतर दोनच दिवसात 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात येतील.

खात्यात जमा होणार 7500 रुपये

31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आणी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचा लाभ देण्यात येणार होता. त्यामुळेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केला असेल आणी तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आता जुलै महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचे एकत्रित 7500 जमा होतील. त्यासाठी लवकरात लवकर तुमची तक्रार नोंद करा.

लवकरात लवकर तुमची तक्रार दाखल करा

लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या टप्प्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोनीही महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीपूर्वीच येत्या 10 ऑक्टोबर पासून वितरित करण्याची सरकारची योजना असल्याने तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या 8 तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असुनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दल तक्रार नोंदवा म्हणजे चौथ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण सुरु होताच तुम्हालाही योजनेचा लाभ मीळेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article