शेतकऱ्यांच्या खात्यात लवकच जमा होणार 2000₹, फक्त वेळेत पूर्ण करा ही प्रक्रिया

2 Min Read
PM Kisan Yojana 19th Installment Date Update

PM Kisan Yojana 19th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. योजनेचा 18 वा हप्ता अलीकडेच ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आला असून, आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

19 वा हप्ता कधी जमा होईल?


पीएम किसान योजनेचे प्रत्येक हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने वितरित केले जातात. 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ता 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

19 वा हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे?
पीएम किसान योजनेचा लाभ नियमित मिळत राहावा यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे:

  1. ई-केवायसी:
    शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. ई-केवायसी नसल्यास हप्ता थांबू शकतो.
  2. भू-सत्यापन:
    पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःच्या जमिनीचे वेरिफिकेशन (भू-सत्यापन) करणे बंधनकारक आहे. जमिनीशी संबंधित सर्व दस्तऐवज तपासले जातात.
  3. आधार-बँक खाते लिंक:
    शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
  4. डीबीटी ऑन करणे:
    बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) चालू आहे की नाही, हे तपासा. डीबीटी पर्याय बंद असल्यास हप्ता मिळणे अडचणीचे ठरू शकते.

पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा महत्वाचा आधार आहे. शेतकऱ्यांनी वर नमूद केलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ घ्यावा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now