Pan 2.0 Scheme: हे पॅन कार्ड ठेवणाऱ्यांना भरावा लागणार ₹10,000 दंड

2 Min Read
Duplicate Pan Card Fine 10000 (Image Source : FILE).

Pan 2.0 Scheme: सरकारने नुकतीच इनकम टॅक्स विभागाच्या पॅन 2.0 योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पॅन आणि टॅन कार्ड्सचे व्यवस्थापन सुधारेल आणी डुप्लीकेट पॅन कार्ड्सवर आळा घालणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. पॅन 2.0 मध्ये, पॅन कार्डच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. (Government’s new Pan 2.0 scheme targets duplicate PAN cards, with penalties of up to ₹10,000 for those holding more than one. Read how to avoid fines and comply with the latest regulations).

डुप्लीकेट पॅन कार्डचा धोका

आयकर अधिनियम, 1961 नुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवू शकत नाही. जर कोणाकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड्स असतील, तर त्या व्यक्तीला संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याचे अतिरिक्त पॅन कार्ड निष्क्रिय करण्यासाठी दाखल करणे आवश्यक आहे. जर त्याने हे केले नाही आणि जर हे पॅन विभागाच्या लक्षात आले, तर त्यावर ₹10,000 पर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो.

पॅन 2.0 च्या मदतीने डुप्लीकेट पॅन कार्ड्स ओळखणे सोपे 

पॅन 2.0 तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डुप्लीकेट पॅन कार्ड्स ओळखने सहज शक्य होईल. यामुळे, कुणी एकापेक्षा जास्त पॅन वापरून बोगसगीरी करू शकणार नाही. आयकर विभागाने चेतावणी दिली आहे की, डुप्लीकेट पॅन कार्ड जवळ ठेवणाऱ्यांना दंड भरावा लागू शकतो.

डुप्लीकेट पॅन कार्ड दाखल न केल्यास काय होईल?

आपल्याकडे जर डुप्लीकेट पॅन कार्ड असेल आणि आपण ते सरेंडर केले नाही, तर आयकर विभाग आयकर अधिनियमाच्या कलम 272बी नुसार ₹10,000 पर्यंतचा दंड लावू शकतो. डुप्लीकेट पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी, आपल्याला NSDL किंवा UTIITSL यासारख्या पॅन सेवा प्रदात्यांमार्फत आवश्यक फॉर्म भरावा लागेल.

महत्वाची सूचना: डुप्लीकेट पॅन कार्ड सरेंडर करण्यापूर्वी, आपला वैध पॅन कार्ड आधार नंबरशी जोडलेला आहे आणि तो आपल्या सर्व आर्थिक रेकॉर्डमध्ये अपडेट आहे, याची खात्री करा.

🔴 हेही वाचा 👉 PAN 2.0: QR कोडसह आलेल्या नवीन PAN कार्डचे फायदे जाणून घ्या.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now