5 वर्ष मोफत वीज योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे शेतकरी, कुणाला मिळणार लाभ?

2 Min Read
Free Electricity Scheme Maharashtra Farmers 2024

Free Electricity Maharashtra Farmers 2024 : पुढील पाच वर्ष मोफत वीज म्हणजेच मार्च 2029 पर्यंत शेताकऱ्यांना मोफत वीज देणारी ही योजना आहे. पण काही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

Free Electricity Scheme For Farmers: शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार (Chief Minister Baliraja Free Power Scheme) जे शेतकरी 7.5 एचपी कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे. मार्च 2029 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Free Electricity Scheme मोफत वीज योजनेचा महाराष्ट्रातील 44 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, या योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अस शासनाच्या जीआरमध्ये सांगितल आहे.

महावितरणला कृषी पंपांच्या बिलाच्या वसुलीची चिंता नेहमीच असते. पण आता या वीज बिलासाठीचे 14760 कोटी रुपये सरकार महावितरणला देणार आहे. कृषी पंप वीज बिलाची एकूण थकबाकी 50 हजार कोटी रुपये आहे. या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी राज्य सरकार महावितरणला 14 हजार 760 कोटी रुपयांचे अनुदान दरवर्षी देणार आहे.

या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

जे शेतकरी 7.5 एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळणार आहे. पण 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षेमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बील भरावे लागेल. ( 7.5  एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योनजेचा लाभ मिळणार नाही). (Free Electricity Scheme Maharashtra Farmers 2024).

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article