Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी बदलला डीपी, सर्वांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे केले आवाहन

2 Min Read
Har Ghar Tiranga Pm Modi Dp Change 2024

Har Ghar Tiranga Campaign: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यंदाचा स्वातंत्र्यदिन जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण पुन्हा हर घर तिरंगा मोहिमेला एक संस्मरणीय जनआंदोलन बनवूया. मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि तुम्हा सर्वांना मी विनंती करतो आहे की तुम्ही सुद्धा प्रोफाईल पिक्चर बदलून आपल्याला तिरंग्याचा आदर करण्यात माझ्यासोबत सहभागी व्हा

Har Ghar Tiranga Abhiyan : पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील त्यांचा डीपी बदलला आहे. Har Ghar Tiranga Campaign: स्वातंत्र्य दिन 2024 पूर्वी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा DP बदलून ‘तिरंगा DP’ (भारतीय ध्वज DP) ठेवला आहे. आणी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी (9 ऑगस्ट) ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला अविस्मरणीय जनआंदोलन बनवण्याचे आवाहन केले.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Pm Narendra Modi News: यासोबतच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या डिस्प्ले पिक्चरवर (डीपी) राष्ट्रध्वज लावून या मोहिमेची सुरुवात केली. आणी आपण सर्वांनीही असेच करावे असे आवाहन त्यांनी केले.

पीएम मोदी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी तुम्हाला विनंती करतो की असे करून आपल्या तिरंग्याचा सन्मान करण्यात माझ्यासोबत सामील व्हा.”

त्याचबरोबर त्यांनी लोकांना त्यांचे सेल्फी ‘हर घर तिरंगा.com (https://harghartiranga.com)’ वर शेअर करण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचा महान सण विशेष बनवण्यासाठी केंद्र सरकार 9 ऑगस्टपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या मोहिमेची समाप्ती होईल.

‘हर घर तिरंगा’ची तिसरी आवृत्ती

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी सांगितले की, 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या स्मरणार्थ ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तिसरी आवृत्ती 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरी केली जाईल.  केंद्रीय मंत्र्यांनी लोकांना त्यांच्या घरी तिरंगा फडकावा, ध्वजासह सेल्फी घ्या आणि हर घर तिरंगा पोर्टलवर अपलोड करा असे आवाहन केले.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे संसद सदस्यांची खास ‘तिरंगा बाइक रॅली’, जी 13 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार आहे. ही रॅली ‘भारत मंडपम’ प्रगती मैदानापासून सुरू होऊन ‘इंडिया गेट’ मार्गे मेजर ध्यानचंद स्टेडियमवर संपेल

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article