LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता अनेकांची गैरसोय होणार आहे. या नियमामुळे काहींना एकही एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. जाणून घ्या काय आहे सरकारचा नवीन निर्णय…
LPG Cylinder Connection eKYC: घरगुती वापरातील सिलेंडरच्या वाढत चाललेल्या किंमती ही समस्या सामान्यांना बऱ्याच काळापासून भेडसावत आहे. यामध्ये आता दिलासा मिळण्यापूर्वीच अनेकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. सरकारच्या नवीन निर्णयामुळे काहींना आता एकही गॅस सिलेंडर मिळणार नाही. सरकारन काय इशारा दिला आहे?
असे अनेक लोक आहेत ज्यांच्या नावावर गॅस सिलेंडर नसतो आणी त्याचबरोबर अनेक ठिकाणी अजूनही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कामांसाठी देखील केला जातो. यामुळेच असे लोक चुकीच्या पद्धतीने ब्लॅकने सिलिंडर खरेदी करतात आणी त्यामुळेच सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आणी सरकार सुद्धा वाढत चालत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती नियंत्रित करण्यात अपयशी ठरत. पण चुकीच्या पद्धतीने दर महिन्याला ब्लॅकने सिलिंडर खरेदी करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण, सरकारने अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्र सरकारच्या नव्या कारवाईअंतर्गत इथून पुढे आता अनेक ग्राहकांचे गॅस कनेक्शन कट करण्यात येणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गित वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या बनावट ग्राहकांना यादीतून वगळण्यासाठी आता आधार कार्डच्या माध्यमातून e-KYC व्हेरिफिकेशन करत आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी e-KYC व्हेरिफिकेशन केल असेल त्यांनाच गॅस सिलेंडर खरेदी करता येईल. आणी त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर थांबेल. आणी त्यानंतर गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करणे सरकारला शक्य होईल.
पुरी यांनी X वर दिलेल्या माहितीनुसार, सध्या पेट्रोलियम कंपन्यांकडून ई केवायसीच्या माध्यमातून गॅस सिलेंडर ग्राहकांची पुन:पडताळणी करण्यात येत आहे. ज्यानंतर बनावट पुराव्यांच्या आधारे सिलिंडर मिळवणाऱ्या ग्राहकांवर चाप लावला जाणार असून, मागील आठ महिन्ययांपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणी आता लवकरच सर्व गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांची पुन:पडताळणी केली जाणार आहे.
वी डी सतीशन यांच्या पत्राला उत्तर देताना पुरी यांनी ही माहिती दिली आहे. याअंतर्गत आता गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची ओळख निश्चित केली जाईल. यामध्ये मोबाईल फोनवर अॅपच्या माध्यमातून माहिती घेतली जाते. तसेच आपण आपल्या गॅस वितरकाकडे जाऊन देखील e-KYC करू शकता.