Ladki Bahin Yojana : तुमच्या खात्यात जमा झाला का 1 रुपया? मगच! जमा होणार लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये

3 Min Read
🔴 हे वाचलं का?🤞

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने (State Government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ‘एक रुपया’ जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तात्रिक प्रक्रियेचा भाग असून वेरिफिकेशन साठी 1 रुपया जमा केला जात असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत खूप अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करने, हे आमच्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगित तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा भाग आहे. ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणानं मदत होणार आहे. अर्जदार माता-भगिनींना आमची विनंती आहे की, हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.”

🔴 हेही वाचा 👉 या योजनेअंतर्गत, ₹ 250, ₹ 500 आणि ₹ 1000 जमा केल्यावर तुम्हाला 74 लाख रुपये मिळतील, लवकरच अर्ज करा.

लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार : अदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज आले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधीची रक्कम नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. बँक खाते वेरिफिकेशन करण्यासाठी हा 1 रुपया जमा केला जात आहे. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

🔴 हे वाचलं का? 👉 Mazi Ladki Bahin Yojana Payment Date: ‘या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता, तारीख जाहीर.

अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंतच

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आता सरकारने लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अजून या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाहीत, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now