Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 4000 रुपये होणार?, कधी पासून? जाणून घ्या

2 Min Read
🔥 ही बातमी वाचली का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याकडून महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. अशातच एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 4000 रुपये होणार. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Maharashtra News: माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधक करत आहेत. लाडकी बहीण योजना बंद पडणार, लाडकी बहीण योजना जास्त दिवस चालणार नाही, निवडणूक होई पर्यंत लाडकी बहीण योजनेचे हफ्ते देतील. अशा टीका विरोधकांकडून होत आहेत. अशातच लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 4000 रुपये होणार.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

विश्वसनिय सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केल्याच्या प्रश्नावर (Mahayuti Sarkar) महायुती सरकारमध्ये सध्या एका मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्यान सांगितलं की, विरोधक काहीही टीका करुदेत. राज्यातील आमच्या भगिनींच्या आरोग्य आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही ही योजना सुरु केली आहे. कल्याणकारी नवीन योजना सुरु करून महाराष्ट्राचा विकास करणं हेच आमच्या सरकारच काम आहे. “आत्ता विरोधक म्हणतायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली” म्हणजेच आम्ही केल म्हणून ओरडतायत*. सुरु केली नसती तर आज हेच “महायुती सरकारन काय काम केल नाही” म्हणून ओरडत असते. पण आमचं काम आम्ही केल. आणी लाडकी बहीण योजनेबद्दल म्हणाल तर ही योजना बंद पडण्याचा तर विषयच सोडा. महिलांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता दर महिन्याला 1500 रुपये ही रक्कम कमी आहे. हे आमच्यापन लक्षात आलय. आणी त्याबद्दल किमान 4000 रुपये हफ्ता करण्याबाबत आमची चर्चा सुद्धा झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

यावर शिक्कामोर्तब होऊन शासन निर्णय कधी जारी होणार, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. सद्यस्थितीत, येत्या 17 ऑगस्टला सरकारकडून महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तुम्ही जर अजून लाडकी बहीण योजेनेसाठी अर्ज केला नसेल तर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article