Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पडणार? अशक्य ही शक्य करतील दादा…

3 Min Read
🔴 ही बातमी वाचायला विसरू नका🤞

Majhi Ladki Bahin Yojana News Today : माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु करून महायुती सरकार जनतेची दिशाभूल करत आहे… महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून विरोधकांकडून अशा टीका सुरुच आहेत. अशा अनेक आरोपांचे अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तरं दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. अजित दादा पवार काय म्हणाले? (DCM Ajit Pawar) जाणून घेऊयात…

महायुती सरकारने (MahaYuti Sarkar) माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यापासून, विरोधकांनी या योजनेवर सतत टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, अर्थ विभागानेही या योजनेला विरोध केल्याचे चर्चेत आले होते. परंतु आता अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

महाराष्ट्रात शासनाद्वारे (Maharashtra Government) सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेद्वारे, राज्य सरकार आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. विरोधकांनी या योजनेवर टीका केली आहे की यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण येईल. तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरु करून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “विरोधी पक्ष म्हणत आहेत की ‘माझी लाडकी बहिण योजना’ चालवणे शक्य नाही. परंतु अशक्य ते शक्य करणे हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे.”

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये या योजनेला लागणाऱ्या ३५,००० कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, “विरोधकांना या कल्याणकारी योजनेला थांबवायचे आहे कारण त्यांना वाटते की ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे. पण लाडकी बहीण योजना बंद पडणं सोडा, मी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करीन.”

अजित दादांनी अर्थ विभागाच्या विरोधाच्या बातम्यांना काल्पनिक आणि तथ्यहीन असे म्हटले आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्याकडे महिलांना दर महिन्याला 1500 देण्याईतकी रक्कम खर्च करण्याची क्षमता आहे आणि राज्य सरकार आत्मनिर्भरता, पोषण आणि सर्वांगीण सशक्तीकरणासाठी ही रक्कम खर्च करण्यास तयार आहे.”

अशा प्रकारे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की ‘माझी लाडकी बहिण योजना’ ही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी सरकारने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार नसून योजनेच्या रक्कमेत अजून वाढच करण्यात येईल.

🔴 हेही वाचा 👉 Maharashtra Cabinet Decision Today : आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णयकोणते आहेत ते येथे जाणून घ्या.

आता जर तुम्हाला कुणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? लाडकी बहीण योजना बंद झाली का, लाडकी बहीण योजना किती दिवस आहे? असले प्रश्न विचारले तर त्यांना ही बातमी सेंड करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article