लाडक्या बहिणींच्या खात्यातील लाभाची रक्कम कपात केल्यास बँकांवर कारवाई – अदिती तटकरे Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Bank Action Aditi Tatkare

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : आता ईथुन पुढे जर महिलांच्या खात्यात जमा केलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकानी कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. (Aditi Tatkare warns banks against deducting funds from Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries’ accounts, with strict action for violations. Special campaign from October 2-7 announced).

1 जुलै पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी महिलांना तीन महिन्याचे हफ्ते देण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे कापून घेऊ नयेत अशा सूचना यापूर्वीच बँकांना देण्यात आल्या होत्या पण तरी देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे कापून घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. या प्रकरणात आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लक्ष घातले आहे.

सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे दरमहा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. यापूर्वीच बँकांना ही कपात न करण्याचे सांगण्यात आले होते. पण तरीही काही बँकांकडून महिलांच्या खात्यात जमा झालेल्या लाभाच्या पैश्यातून कपात करणे सुरूच आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांच्या खात्यात जमा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैश्यातून कपात न करण्याचे निर्देश बँकांना दिले असून आता ईथुन पुढे महिलांच्या खात्यात जमा केलेले पैसे बँकांनी कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

त्याच बरोबर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत याची दखल घेत आज 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी आणी बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणी महिलांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात यावेत अशा सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now