Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठीची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत आज संपत आहे. त्यामुळे बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी बँकांच्या बाहेर महिलांची मोठी गर्दी झाली असून अनेक बँका आणी पोस्ट ऑफिसबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. (Women rush to banks as the deadline for Majhi Ladki Bahin Yojana nears. Aadhaar linking is essential to receive benefits directly in accounts. Final efforts underway).
माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नसल्याने महिला व बाल विकास विभागाने महिलांनी बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे जेणेकरून लवकरात लवकर योजनेचा लाभ खात्यात जमा करता येईल, असे आवाहन केले होते. त्यामुळेच बँकांच्या बाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे बँक व्यवस्थापनाला देखील त्यांचे दैनंदिन कामकाज काही प्रमाणात बाजूला ठेवून महिलांच्या आधार लिंक करून घेण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे लागत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डिबीटी द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात असल्याने बँक खात्याला आधार लिंक केलेले असणे आवश्यक आहे. आधार लिंक नसेल तर पात्र असूनही लाभ मिळत नाही. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात तरी योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.