Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल! लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

2 Min Read
🔴 व्हिडीओ पाहा🤞

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eknath Shinde Video : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना दरमाहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजून या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही अशा महिलांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल @CMOMaharashtra वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः योजनेबद्दल बोलले, “राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार… ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमाहा 1500 रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या भावाने घेतला आहे. योजनेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासूनचा लाभ देण्यात येणार आहे.” 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आले आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ. मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यातील सर्व महिलांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ पाहा

🔴 हेही वाचा 👉 Mazi Ladki Bahin Yojana Payment Date: ‘या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता, तारीख जाहीर.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now