ही आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनण्याची सुवर्णंसंधी, Majhi Ladki Bahin Yojana Last Date To Apply

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extended

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात नुकतेच जमा केले आहेत. आता माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त झाली असून लाडकी बहिन योजनेबाबत एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (Maharashtra extends the application deadline for Majhi Ladki Bahin Yojana to 15th October 2024. Apply now to avail benefits! Learn how to submit your application through Anganwadi Sevika).

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर होती ही मुदत वाढवून आता 15 ऑक्टोबर करण्यात आली आहे. राज्यातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

ज्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले नसतील अशा महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरून जमा करावेत असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आली असून महिलांना अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरता येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article