येत्या 48 तासात पैसे जमा झाले नाहीत तर… Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Delay Update 2024

Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हफ्ते जमा होत असून. त्यानुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा होत आहेत. तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का? (Majhi Ladki Bahin Yojana: Payments for October and November are being deposited, but if not received by October 10, you may have to wait until after the upcoming elections).

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Payment Delay Update 2024 : ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते अशा महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये तर ज्या महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये जमा करण्यात येत आहेत.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सूरूवात केली असून काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये तर काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा करण्यात येत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Money Not Received : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे दोनीही हफ्ते एकत्रच महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 5 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सूरूवात केली आहे. आणी ही प्रक्रिया 10 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. 10 ऑक्टोंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याच सांगण्यात आल आहे. जर 10 ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे तुम्हाला पैसे जमा होण्यासाठी निवडणुका होई पर्यंत वाट पाहावी लागू शकते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article