Mazi Ladki Bahin Yojana: 2 मिनिटात बघा तुमच्या अर्जाच नेमक काय झालं? माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही

5 Min Read
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 Check Application Status

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 Status Types: माझी लाडकी बहीण योजना यादी  (Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List) जाहीर झाली आहे. आणी 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. वेबसाईट सर्व्हर डाउनच्या करणास्तच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला अजूनही समजले नसेल तर. त्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा आणी तुमचा अर्ज कुठपर्यंत आला आहे? तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती काय? त्याचे नेमके किती प्रकार आहेत? तुमचा अर्ज पात्र ठरला नसल्यास त्याचे कारण काय आहे? ते कस समजणार याबाबत सविस्तरपणे जाणून घ्या.

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 Application Status Check Online : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे सहजपणे पाहता येणार आहे. सरकारकडून याबाबतची यादी जाहीर करण्यात आली आहे. 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. वेळीच तुम्हाला ही गोष्ट समजली नाही तर तुम्हाला 1500 रुपये मिळण्याची शक्यता कमी होऊ शकतो. (Mazi ladki bahin yojana application status check online)

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची?

App वर तपासा तुमच्या अर्जाचं स्टेट्स

  • 1: लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • 2: नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करा आणि लॉगिन तपशील टाकून लॉगिन करा.
  • 3: ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर, तुमचा अर्ज क्रमांक किंवा अर्जदार महिलेचे नाव टाका आणि गेट स्टेट्स या पर्यायावर क्लिक करा.
  • 4: आता तुमच्या समोर स्टेट्स उघडेल ज्यात तुम्हाला Approval, Pending, Reject असे तीन पर्याय दिसतील. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेट्स तपासून शकता.

वेबसाइटवरून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची?

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • 1: सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावा.
  • 2: वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. होम पेजवर दिसत असलेल्या अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
  • 3: क्लिक केल्यावर, तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. तिथे तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका.
  • 4: यानंतर कॅप्चा कोड टाका आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • 5: लॉगिन केल्यावर, तुमच्या समोर डॅशबोर्ड उघडेल जिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना अर्जाच्या स्टेट्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • 6: क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुमचा अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव टाका आणि Get Status या पर्यायावर क्लिक करा.
  • 7: आता तुमच्यासमोर स्टेटस उघडेल ज्यात तुम्हाला पेंडिंग, अप्रूव्हल, रिजेक्ट या तीन पर्यायांपैकी एक पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.

वरील स्टेप्स फॉलो करून तुम्ही लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन सादर केलेल्या लाडकी बहिन योजनेच्या प्रलंबित अर्जाची स्थिती तपासू शकता.

लाडकी बहीण योजना स्टेट्सचे प्रकार

  • प्रलंबित स्थिती (Pending Status): जर तुमच्या अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित म्हणून दाखवत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्ज अजून तपासलेला नाही.
  • रिजेक्ट स्टेटस (Reject Status): जर तुमच्या अर्जाची स्थिती Reject दाखवत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज अपात्र ठरला आहे.
  • पुनरावलोकन स्थिती (Review Status): जर तुमच्या अर्जाची स्थिती Review दाखवत असेल, तर याचा अर्थ असा आहे की, सरकारकडून तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन केले जात आहे.
  • मंजुरीची स्थिती (Approval Status): जर तुम्ही तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती Approval असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला आहे.

अर्जाची स्थिती प्रलंबित (Pending) असल्यास काय करावे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील करोडो महिलांनी अर्ज केले असून त्यातील काही महिलांचे अर्ज प्रलंबित असल्याचे दाखवत आहे. त्यामुळेच महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जर तुमच्या अर्जाचे स्टेट्स अजूनही (Pending) दिसत असल्यास तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मोठ्या संख्येने आलेल्या अर्जाची पडताळणी करायची असल्याने वेळ लागत आहे आणी त्यामुळे तुमचा अर्ज तपासायला वेळ लागत आहे. अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचा देखील अर्ज मंजूर केला जाईल.

माझी लाडकी बहीण योजना अर्जासंबंधित तक्रारीसाठी कुठे संपर्क साधावा?

महिला व बाल विकास विभाग तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड हुतात्मा राजगुरू चौक मुंबई महाराष्ट्र भारत – ४००३२.

टोल फ्री संपर्क क्रमांक : 181

लाडकी बहीण योजना अर्जात चुका झाल्या असल्यास काय करावे?

तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा आणि तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article