मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादीत नाव आले नाही? तर अशी नोंदवा तक्रार

3 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Complaint Registration Maharashtra

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News Today: महाराष्ट्रात नव्याने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की नाही हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. (Majhi Ladki Bahin Yojana Complaint Registration Process).

Majhi Ladki Bahin Yojana List Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे रोज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. माझी लाडकी बहिन योजनेचा पहिला हफ्ता 15 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. माझी लाडकी बहिन योजनेचे पैसे मिळण्यासाठी पात्रता प्रक्रिया काय आहे आणि सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या दोन याद्या काय आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

सरकार जाहीर करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या दोन याद्या

माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. आता शासनाकडून दोन याद्या जारी केल्या जाणार आहेत. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सरकार 28 जूनच्या शासन निर्णयानुसार अर्ज प्राप्त झालेल्या महिलांची पहिली तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही तात्पुरती जाहीर करण्यात आलेली यादी पोर्टल आणि ॲपवर उपलब्ध असेल. याशिवाय या यादीच्या प्रती अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत आणि प्रभाग स्तरावरील सूचना फलकावर देखील लावल्या जातील.

लाडकी बहिन योजना यादीत नाव आले नसल्यास तक्रार नोंदवता येईल

जर या तात्पुरत्या जाहीर करण्यात आलेल्या यादीवर आपला काही आक्षेप असल्यास आपल्याला पोर्टल किंवा ॲपद्वारे आपली तक्रार नोंदवता येईल. ताईच सेतू सुविधा केंद्रामार्फत अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देखील दाखल करता येईल. त्या ऑफलाइन प्राप्त झालेल्या अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये करून ती ऑनलाइन अपलोड केली जाईल.

यासाठी पात्र लाभार्थ्यांची पाहिली यादी प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला पाच दिवसांच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक असेल. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

आलेल्या सर्व तक्रारिंचे समितीद्वारे निवारण केले जाईल. आणि त्यानंतर लाडकी बहिन योजनेस पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांच्या स्वतंत्र याद्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, प्रभाग स्तर, सेतू सुविधा केंद्र, पोर्टल आणि ॲपवर प्रसिद्ध केल्या जातील.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: अस तपासा यादीत तुमच नाव, जाणून घ्या तुम्हाला 1500 रुपये मिळणार की नाही?.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now