मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म डाऊनलोड करा, Majhi Ladli Bahin Yojana Form Download

3 Min Read
Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Form Download 2024

माझी लाडकी बहीण योजना फॉर्म

How To apply For Ladki Bahin Yojana: शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप आपण गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता आपल्याला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा लाभ १ जुलैपासूनच मिळणार आहे. ऑनलाईन सोबतच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞
मुख्यमंत्री-माझी-लाडकी-बहीण-योजना-फॉर्म
मुख्यमंत्री-माझी-लाडकी-बहीण-योजना-फॉर्म

Ladki Bahin Yojana online Form 2024: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा फोटो आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला घरी बसूनच ऑनलाइन अर्ज करु शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यात आपले नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व महिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. बँक खाते देताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे, तेच खाते द्यावे लागणार आहे. त्यात बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरावा लागणार आहे. आणी तुमचे आधार त्या बँक खात्याशी लिंक असायला हवे.

शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा लाभ १ जुलैपासूनच मिळणार आहे. तसेच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे.

नारीशक्ती दूत ॲपवरुन अशी भरा माहिती

नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केल्यावर त्यात तुमची माहिती भरून प्रोफाईल बनवा. तुमचे नाव आणि इतर माहिती भरा. योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये यारते ती माहिती भरा. मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स भरा. अर्जदाराचा फोटो अपलोड करा. आणी लागणारी कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. शेवटी अर्ज भरून पूर्ण झाल्याचा एक मेसेज तुम्हाला येईल.

🔴 माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article