चार लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा, Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status Update

1 Min Read
Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status Update 3000 Rs Transferred

Mukhyamantri Vayoshri Yojana Latest News : महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. चार लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. (Over 4 lakh beneficiaries received ₹3000 under Mukhyamantri Vayoshri Yojana. Eknath Shinde launched the scheme with DBT transfers. Verification ongoing for pending payments).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे योजनेचे पैसे हस्तांतरीत करुन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत राज्यातील १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी 3000 रुपये याप्रमाणे एकूण १२३.६३ कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. अर्ज छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम अजून सुरु असून ते पूर्ण होताच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पैसे जमा होतील.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now