आता पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी लागतात ही कागदपत्रे, असा करा अर्ज PM Awas Yojana Maharashtra Online Registration

2 Min Read
PM Awas Yojana Documents Registration Process Maharashtra

PM Awas Yojana Documents in Marathi: पीएम आवास योजनेद्वारे सरकारकडून तुम्हाला घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते जाणून घ्या…

भारतात आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना राहायला स्वत:चे पक्के घर नाही. ग्रामीण व शहरी भागातही तीच परिस्थिती आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक लोकांना स्वतःचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. देशातील सर्वसामान्य नागरिकांची ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाना पक्की घरे बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीएम आवास योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक असते ती कागदपत्रे कोणती आहेत? याबद्दल जाणून घेऊयात…

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

पीएम आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
अधिवास प्रमाणपत्र
वयाचे प्रमाणपत्र
मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट
घर, जागेशी संबंधित कागदपत्रे
जात प्रमाणपत्र

पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • * पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी pmaymis.gov.in या वेबसाईट वर जा. 
  • * सिटिझन असेसमेंट या पर्यायावर क्लिक करा.
  • * तुमची कॅटेगिरी निवडा.
  • * तुमच्या आधार कार्डवर असलेली माहिती व्यवस्थित भरा. 
  • * दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज भरा आणि अर्ज सबमीट करा 
  • * अर्ज सबमीट केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ती तुमच्याकडे जपून ठेवा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article