Pm Kisan Yojana Marathi : भारत सरकारद्वारे विविध फायदेशीर आणि कल्याणकारी योजना चालवल्या जात आहेत ज्यांचा लाभ पात्र लोकांना दिला जातो. यतीलच शेतकऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना आहे, तिचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) आहे. या योजनेचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांना दिला जातो. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकता. परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. म्हणूनच, जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पहिला तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात की नाही. चला तर मग जाणून घेऊया पीएम किसान योजना माहिती…
पीएम किसान योजना लाभार्थ्यांना काय लाभ मिळतो?
पीएम किसान योजनेअंतर्गत सध्या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत. हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. सरकार हे पैसे डीबीटीद्वारे देते आणि पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ?
- जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत
- ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेतीयोग्य जमीन आहे
- अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे
- सर्व पात्रता अटी पूर्ण करणारे शेतकरी इ.
अशा प्रकारे तुम्ही Pm किसान योजनेचा लाभ घेऊ शकता
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल आणि त्यानंतर ‘नवीन शेतकरी नोंदणी’ वर क्लिक करावे लागेल. आणी तुमची सर्व माहिती भरून अर्ज करावा लागेल.
पीएम किसान योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत?
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. मागील हप्त्याचा म्हणजेच 17 व्या हप्त्याचा लाभ 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आला. त्याच वेळी, आता शेतकऱ्यांना pm किसान योजनेचा 18 वा हफ्ता मिळणार आहे. 18 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी केला जाऊ शकतो. पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी करण्याची तारीख अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही.