सर्व असंघटित कामगार मजुरांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन PM Shram Yogi Mandhan Yojana

3 Min Read
Pm Shram Yogi Mandhan Yojana Monthly Pension Unorganised Workers

Pm Shram Yogi Mandhan Yojana | पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना: अशा अनेक सरकारी योजना आहेत त्यांचा जास्त प्रसार झाला नसल्या कारणाने त्या कधी लोकांना माहीतच झाल्या नाहीत त्यामुळे अनेकांना त्यांचा लाभ घेता आला नाही. आज आपण अशाच एका असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असणाऱ्या सरकारी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कामगारांना होणार आहे. रस्त्यावरील विक्रेते, चालक, प्लंबर, शिंपी, धोबी, इस्त्री काम, भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार अशा अनेक कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Pm Shram Yogi Mandhan Yojana Details in Marathi | पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना: देशात असंघटित क्षेत्रात काम करणारे करोडो कामगार आहेत. यांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करम्यासाठी रोज मेहनत करावी लागते. पण जेव्हा असे मोल मजुरी करणारे लोक वयस्कर होतात. जेव्हा ते रोज काम करु शकत नाहीत. तेव्हा त्यांना कमाईचे कोणतेही साधन नसते. अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरी करण्यात कामगारांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने एक अतिशय चांगली योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव (Pm Shram Yogi Yojana) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे. असंघटित क्षेत्राशी निगडित कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आज आपण येथे पीएम श्रम योगी मानधन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Pm Shram Yogi Mandhan Yojana | पीएम श्रम योगी मानधन योजना

18 ते 40 वर्षे वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगार पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम तुम्ही अर्ज करत असलेल्या वयाच्या आधारे ठरवली जाते. पीएम श्रम योगी मानधन योजनेतील गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज केला तर. तुम्हाला दररोज 2 रुपयांपेक्षा कमी बचत करावी लागेल आणि पीएम श्रम योगी मानधन योजनेत दरमहा फक्त 55 रुपये गुंतवावे लागतील.

आणी तुम्ही 60 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ६० वर्षा नंतर, तुम्हाला पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत दरमहा ३,००० रुपये पेन्शन मीळेल.

पीएम श्रम योगी मानधन योजनेचा कुणाला घेता येतो लाभ?

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ रस्त्यावरील विक्रेते, चालक, प्लंबर, शिंपी, धोबी, इस्त्री काम, भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा वेचणारे, विडी उत्पादक, हातमाग कामगार, दुसऱ्याच्या शेतात काम करणारे, असे अनेक कामगार जे असंघटित क्षेत्राशी निगडित आहेत ते पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्या सहकार्यांसोबत ‘ही बातमी शेयर करा’. आणी अशाच प्रकारच्या सरकारी योजना संबंधित बातम्या वाचण्यासाठी “मराठी सरकारी योजना व्हाट्सअप चॅनेल’ फॉलो करा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now