लहान व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना 50 हजार रुपयांपर्यंत विना गॅरंटी कर्ज Pm Svanidhi Yojana

3 Min Read
Pm Svanidhi Yojana Small Business Loan Without Collateral

Pm Svanidhi Yojana In Marathi | काय आहे पीएम स्वानिधी योजना: तुम्ही जर दुकानदार असाल किंवा एखादा लहान व्यवसाय करत असाल तर PM स्वानिधी ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, लहान व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना विना तारण कर्ज मिळते. आणी या योजनेतील व्याजदरही खूप कमी आहे. 

कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी पहिली गरज असते ती म्हणजे पैशाची. दुकानदार आणी लहान व्यवसायिकांना उधारीवर माल विकावा लागत असल्यामुळे त्यांना अनेकदा आर्थिक टंचाईच सामना करावा लागतो. आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी छोटे व्यावसायिक अनेकदा पतसंस्था, खाजगी बँकेमधून कर्ज घेतात खाजगी बँकांच्या असणाऱ्या भरमसाठ व्याजामुळे ते कर्जाच्या सापळ्यात अडकून राहतात.

दुकानदार आणी छोटया व्यवसायिकांच्या अशा गरजांसाठी केंद्र सरकारने 2020 मध्ये एक योजना सुरू केली होती, जी दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी वरदान ठरत आहे.  या योजनेचे नाव ‘स्वानिधी योजना’ आहे, ज्या अंतर्गत कोणत्याही तारण न घेता व्यवसायिकांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते.

पीएम स्वानिधी योजना काय आहे?

सन 2020 मध्ये, कोविड महामारीमध्ये लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार आणी लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फटका बसला, तेव्हा केंद्र सरकारने ‘पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधि’ (पीएम स्वानिधी) योजना सुरू केली. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला सुरक्षा म्हणून काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. ही योजना बीना तारण सुलभ कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम एका वर्षासाठी कर्ज म्हणून सहज उपलब्ध होते. या कर्जावर आकारले जाणारे व्याजही खूपच कमी आहे.

पीएम स्वानिधी योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

रस्त्यावरील विक्रेते किंवा शहरी भागात राहणारे छोटे दुकानदार, जे 24 मार्च 2020 किंवा त्यापूर्वी पासून आपला व्यवसाय चालवत आहेत, ते या योजनेअंतर्गत सहज कर्ज घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी, विक्रेत्याकडे शहरी स्थानिक संस्थेचे वेंडिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात ओळखले गेलेले परंतु वेंडिंग प्रमाणपत्र नसलेले विक्रेते देखील तात्पुरत्या प्रमाणपत्राद्वारे योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते?

पीएम स्वानिधी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विना तारण उपलब्ध आहे. एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर, 10,000 रुपयांची पहिली रक्कम दिली जाते, ज्याची परतफेड केल्यानंतर तुम्ही 20,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही या 20 हजार रुपयांच्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या या कर्जावर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याज आकारतात.

पीएम स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेशी संपर्क साधावा लागेल. तेथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल, जो तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह भरावा लागेल आणि बँकेत जमा करावा लागेल. यानंतर, बँक अधिकारी तुमचा फॉर्म आणि तुमचे काम तपासतील आणि सर्वकाही बरोबर आढळल्यास, तुमचे कर्ज पास केले जाईल. आणी लगेच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर दुकानदार किंवा छोटे व्यावसायिक असाल आणी तुम्हाला कर्ज हवे असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

अशाच प्रकारच्या ‘सरकारी योजनांबद्दलच्या मराठी बातम्यांसाठी’ (मराठी सरकारी योजना) व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा.

(Dukandar yojana maharashtra, Dukandar yojana in marathi, dukandar karj yojana maharashtra).

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article