Best Post Office Scheme in Marathi : प्रत्येक जण आपल भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी कमी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्यासाठी चांगला गुंतवून पर्याय शोधात असतो. यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा एक उत्तम आणी सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित समजले जाते म्हणूनच देशातील कोट्यवधी लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्यात गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित राहतेच आणी त्यासोबतच चांगला परतावाही मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या अनेक फायदेशीर योजना आहेत, पण आज आपण जाणून घेणार आहोत ते सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजेबद्दल.
काय आहे सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना?
सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा लाभ 19 ते 45 वयोगटातील कोणीही घेऊ शकतो.
सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमाही मिळतो. तसेच या योजनेत दोन मॅच्युरिटी पीरियड असतात म्हणजेच पॉलिसीधारक 15 वर्षे किंवा 20 वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड निवडू शकतो.
यामध्ये मॅच्युरिटीवर बोनस सुद्धा दिला जातो. या योजनेत जर तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर. त्यामुळे 15 वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडअंतर्गत 6, 9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20% रक्कम मनी बॅक म्हणून मिळेल.
आणी तेच जर तुम्ही 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर विमाधारकाला 8,12,16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीवर बोनससह परत मिळते.
जर एखाद्या 25 वर्षाच्या व्यक्तीने 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20 वर्षांची पॉलिसी घेतली तर त्याला दररोज फक्त 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल म्हणजेच एका महिन्याला त्याला 2850 रुपये आणि 6 महिन्यात 17,100 रुपये भरावे लागतील.
20 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर ही रक्कम 14 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीला 14 लाख रुपये मिळतील 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 8, 12 व्या आणि 16 व्या वर्षी 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 20% कॅशबॅक मिळतो. 7 लाख रुपयांच्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम 1.4 लाख रुपये आहे. तीन देयकांनंतर ते एकूण 4.2 लाख रुपये होईल. यानंतर 20 व्या वर्षी तुम्हाला 2.8 लाख रुपये मिळतील. यामुळे विम्याची रक्कम पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला वार्षिक 48 रुपये प्रति हजार बोनस मीळेल. 20 वर्षांत ही रक्कम 6.72 लाख रुपये ईतकी होईल. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 9.52 लाख रुपये मिळतील. मनी बॅक आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम मिळून एकूण 13.72 लाख रुपये होतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस मराठी सरकारी योजना डॉट इन जबाबदार राहणार नाही.