तुमच्याकडची 500 रुपयांची नोट बनावट तर नाही ना? Rbi ने दिल्या बनावट नोटा ओळखण्याच्या टिप्स

4 Min Read
Rbi 500 Rupees Fake Note Identification Tips

Fake Note Identification Rbi : भारताची केंद्रीय बँक (भारतीय रिजर्व बैंक) RBI ने बाजारात आणि ATM मधून येणाऱ्या 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (fake currency rbi guidelines)  RBI फक्त 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या खऱ्या नोटा जारी करते.

Fake Note News : सध्या भारतात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळेच नागरिकांना आपल्याजवळ असणारी 500 रुपयांची नोट बनावट तर नाही ना? असा प्रश्न पडतो आहे. कारण आजकाल बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्या आहेत. काही वेळा बँकेच्या एटीएममधूनही बनावट नोटा येत आहेत.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Rbi 500 Rupee Note News: यापूर्वी देशात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनात होत्या, त्यावेळीही बनावट नोटा वेगाने चलनात येत होत्या. 8 नोव्हेंबर 2016 नंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर आता 2000 रुपयांची नोटही चलनातून बाहेर पडली आहे, त्यामुळे मोठ्या नोटांमध्ये फक्त 500 रुपयांची नोट उरली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि बनावट नोटा ओळखण्यासाठी एक पद्धत सुचवली आहे. चला, 500 रुपयांची बनावट नोट ओळखण्यासाठी RBI ने कोणती पद्धत सांगितली आहे ते जाणून घेऊयात.

एटीएम मधूनही येते 500 रुपयांची बनावट नोट

Rbi फक्त 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या खऱ्या नोटा जारी करते, मात्र देशातील सरकारी आणि खासगी बँकांच्या डोळ्यात धूळफेक करून एटीएममध्ये बनावट नोटा पोहोचवण्यात बनावट नोटा छापणारे यशस्वी होत आहेत. जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाता, तेव्हा नकळत तुमच्या हातात ५०० रुपयांची बनावट नोट आली तर तुम्हाला माहित सुद्धा होत नाही की तुमच्याकडे असणारी 500 रुपयांची नोट बनावट आहे.

How to identify 500 rs note rbi: आरबीआयने ५०० रुपयांची बनावट नोट कशी ओळखायची ते सांगितले आहे 

भारताची केंद्रीय बँक RBI ने बाजारात आणि ATM मधून येणाऱ्या 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंग्रजी वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ग्राहकांना खऱ्या आणि खोट्या 500 रुपयांच्या नोटांची ओळख पटवण्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, महात्मा गांधींच चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटांवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असा शिलालेख आहे. तर नोटेच्या मागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्रही छापण्यात आले आहे. हे नोटेच्या मागील बाजूस छापलेले लाल किल्ल्याचे चित्र देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. नोटेचा मूळ रंग स्टोन ग्रे आहे. या नोटेमध्ये इतर डिझाईन्स आणि भौमितिक नमुने आहेत, जे समोर आणि मागे रंगसंगतीला मिरर करतात. आरबीआयचे म्हणणे आहे की नोटेचा आकार 63 मिमी बाय 150 मिमी आहे.

अशाप्रकारे ओळखता येतात ५०० रुपयांच्या बनावट नोटा 

500 Rupees Fake note identification RBI:

  • आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 500 रुपयांच्या मूळ नोटेवर लिहिलेला ‘500’ हा क्रमांक पारदर्शक आहे.
  • याशिवाय ५०० रुपयांच्या नोटेवर एक अव्यक्त प्रतिमा आहे.
  • 500 रुपयांच्या खऱ्या नोटेवर देवनागरी लिपीत त्याचा मूल्य क्रमांक शब्दात लिहिलेला असेल.
  • ५०० रुपयांच्या असली नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र छापलेले असेल.
  • ५०० रुपयांच्या खऱ्या नोटेवर अगदी छोट्या अक्षरात हिंदीत ‘भारत’ आणि इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेले असेल.
  • रंग बदलणाऱ्या विंडोमध्ये एक सुरक्षा धागा देण्यात आला आहे, ज्यावर देवनागरी म्हणजेच हिंदीमध्ये ‘भारत’ आणि ‘आरबीआय’ लिहिलेले असेल.
  • विशेष म्हणजे नोट तिरकी करून पाहिल्यावर, सुरक्षा धाग्याचा रंग हिरव्या असणारा रंग निळ्या रंगामध्ये बदलतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article