Tag: PM Kisan eKYC

  • शेतकऱ्यांच्या खात्यात लवकच जमा होणार 2000₹, फक्त वेळेत पूर्ण करा ही प्रक्रिया

    शेतकऱ्यांच्या खात्यात लवकच जमा होणार 2000₹, फक्त वेळेत पूर्ण करा ही प्रक्रिया

    PM Kisan Yojana 19th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. योजनेचा 18 वा हप्ता अलीकडेच ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आला असून, आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

    19 वा हप्ता कधी जमा होईल?


    पीएम किसान योजनेचे प्रत्येक हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने वितरित केले जातात. 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ता 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

    19 वा हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे?
    पीएम किसान योजनेचा लाभ नियमित मिळत राहावा यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे:

    1. ई-केवायसी:
      शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. ई-केवायसी नसल्यास हप्ता थांबू शकतो.
    2. भू-सत्यापन:
      पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःच्या जमिनीचे वेरिफिकेशन (भू-सत्यापन) करणे बंधनकारक आहे. जमिनीशी संबंधित सर्व दस्तऐवज तपासले जातात.
    3. आधार-बँक खाते लिंक:
      शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
    4. डीबीटी ऑन करणे:
      बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) चालू आहे की नाही, हे तपासा. डीबीटी पर्याय बंद असल्यास हप्ता मिळणे अडचणीचे ठरू शकते.

    पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा महत्वाचा आधार आहे. शेतकऱ्यांनी वर नमूद केलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ घ्यावा.

  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होऊ शकतात 2 हजार रुपये PM Kisan Yojana 18th Installment Date

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होऊ शकतात 2 हजार रुपये PM Kisan Yojana 18th Installment Date

    PM Kisan 18th Installment Details: आपल्या कृषिप्रधान भारत देशात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातीलच केंद्राकडून राबवली जाणारी फायदेशीर योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. जर तुम्ही शेतकारी असाल आणी अजूनही या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ अवश्य घेतला पाहिजे, आणी ही प्रक्रियाही अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करावा लागेल. जे आधीपासूनच या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पुढील म्हणजेच 18 व्या हप्त्याचा लाभ लवकरच मिळू शकतो, पण जर तुम्हाला 18 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची काम पूर्ण करावी लागतील. ही कामे वेळेत पूर्ण न केलेले शेतकरी 18 व्या हफ्त्यापासून वंचित राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ती कामे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 वा हप्ता कधी जमा केला जाऊ शकतो… (PM Kisan Yojana 18th installment to be released soon. Ensure land records verification, eKYC, and Aadhaar linkage to your bank account to receive Rs 2000).

    शेतकऱ्यांनी ही 3 कामे वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे

    • 1: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे गरजेचे आहे जर एखाद्या शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नाही तर त्यांचा हप्ता अडकतो. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.
    • 2: तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकरच ई-केवायसी करा. तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्रावत जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.
    • 3: तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्याची आणी DBT पर्याय सक्रिय असल्याची खात्री करा. नसल्यास हे काम लवकरात लवकरच करा. कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे बँकेत जमा होण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

    पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी येऊ शकतो?

    पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण 17 हप्ते मिळाले आहेत. शेवटचा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. यानुसार 18वा हप्ता जरी करण्याची वेळ ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो, मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • या चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांचा अडकू शकतो 18 वा हप्ता, तुम्ही करत आहात का या चुका आत्ताच तपासा Pm Kisan 18th Installment Mistakes

    या चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांचा अडकू शकतो 18 वा हप्ता, तुम्ही करत आहात का या चुका आत्ताच तपासा Pm Kisan 18th Installment Mistakes

    Pm Kisan 18th Installment Date: भारत सरकार दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत करोडो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये PM किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा करते. PM किसान योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता दिला जातो अशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये सरकारकडून दिले जातात. आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले असून त्याअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, ज्याचा लाभ कोट्यवधी होणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की अशा काही चुका आहेत ज्यामुळे तुमचा PM किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचा पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता अडकू शकतो…

     जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही योजनेच्या लाभासाठी भरलेली माहिती चुकीची असल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे झाल्यास नियमानुसार तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी, तुम्हाला ही चुकीची माहिती आधी दुरुस्त करावी लागेल.

    जर तुम्ही भरलेली बँक खात्याबद्दलची माहिती चुकीची असेल तर तुम्हाला ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल. तसेच आधार कार्डची माहिती किंवा आधार क्रमांक चुकीचा टाकल्यास इ. अशा परिस्थितीतही, तुम्हाला ती माहिती दुरुस्त करावी लागेल, ज्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट देऊ शकता. आणी चुकीची माहिती दुरुस्त करू शकता.

    त्याचबरोबर पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही तरी ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे वेळेत ई-केवायसी पूर्ण करा म्हणजे तुम्हाला 18 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल.

    जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर त्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.  जिथे तुम्ही e-KYC च्या पर्यायावर क्लिक करून ई-केवायसी करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करून घेऊ शकता.