Indira Gandhi National Widow Pension Scheme | इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना: ही योजना विधवा महिलांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागू नये या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून विधवा महिलांना आर्थिक मदत केली जाते.
Indira Gandhi National Widow Pension Scheme : महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सकरकडून (Maharashtra Government Schemes) अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातीलच राज्यातील निराधार महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी असणारी एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (Indira Gandhi National Widow Pension Scheme). महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक मदत केली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा उद्देश
Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra: महाराष्ट्रातील विधवा महिलांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही विषबून राहावे लागू नये यासाठी विधवा महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योनेद्वारे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना पेन्शनची रक्कम दिली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्रे (Required documents For Indira Gandhi National Widow Pension Scheme)
- 1: विहीत नमुन्यातील अर्ज
- 2: वयाचा दाखला (40 ते 70 वर्ष)
- 3: विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक
- 4: रहिवासी दाखला (लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक)
- 5: आधार कार्ड
- 6: रेशनकार्ड
- 7: निवडणूक ओळखपत्र,
- 8: बँक पासबुक झेरॉक्स
- 9: अर्जदाराचा फोटो
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थी महिलेला राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये पेन्शन दिली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? (How To Apply For Indira Gandhi National Widow Pension Scheme)
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्या.
ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?
(Indira Gandhi National Widow Pension Scheme Apply Online)
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate