Bandhkam Kamgar Nondani Documents : बांधकाम कामगारांना मोफत भांडी, बांधकाम कामगार पेटी, बांधकाम कामगारांच्या मुलांना १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, घरकुल अशा एकूण 32 विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो. पण या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारच या योजनांचा लाभ घेऊ शकतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याबद्दल जाणून घेऊयात… (List of 5 essential documents for Bandhkam Kamgar registration: Aadhaar card, ration card, bank passbook, 90-day work certificate, and declaration form. Avail all the benefits!).
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत खालील कागदपत्रे
- 1: आधार कार्ड
- 2: रेशन कार्ड
- 3: बँक पासबुक
- 4: घोषणापत्र
- 5: 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्रे लागतात. 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याच्या प्रमाणपत्रावर शासकीय कंत्राटदार आणि ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक असते.
मध्यंतरीच्या काळात बांधकाम कामगारांना हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळवण्यात खूप अडचणी येत होत्या पण आता हे प्रमाणपत्र सहज उपलब्ध होत आहे. तुमच्याकडे जर वरील सर्व आवश्यक कागदपत्रे असतील (Bandhkam Kamgar Registration Documents) तर तुम्ही फक्त 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी करू शकता व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.