Majhi Ladki Bahin Yojana Beneficiaries Review 2025: महाराष्ट्रातील *माझी लाडकी बहिण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या २.६३ कोटी लाभार्थ्यांना प्रति महिना १,५०० रुपये अनुदान दिले जात आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने आता या योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्यांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेमुळे सुमारे २० लाख महिलांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra to review Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries, possibly excluding 20 lakh women receiving benefits from other schemes. Focus shifts to genuine and deserving recipients).
कशामुळे घेतला जातोय निर्णय?
महिला आणि बालकल्याण विभागाने नमूद केले आहे की, अनेक लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांचे देखील लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्याची तक्रार होती. मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या, “जर अन्य योजनांमधील अनुदान माझी लाडकी बहिण योजनेच्या १,५०० रुपयांच्या रकमेपेक्षा अधिक असेल, तर अशा लाभार्थ्यांची नावे लाडकी बहीण योजनेच्या यादीतून (Majhi Ladki Bahin Yojana List 2025) वगळली जातील. मात्र, कमी रक्कम मिळत असेल, तर फरक या योजनेतून भरून दिला जाईल.”
पुनरावलोकन प्रक्रिया
पुनरावलोकन प्रक्रियेत, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व महिलांना योजनेतून वगळले जाईल. सरकारने नमूद केले आहे की, यामुळे प्रामाणिक करदात्यांचा पैसा फक्त गरजूंपर्यंत पोहोचेल.
🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये फ्री गॅस सिलेंडर मिळवण्यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया.
योजनेचे राजकीय परिमाण
माझी लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) ही २०२4 मध्ये एकनाथ शिंदे सरकारने सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाला होता. मात्र, सध्याच्या बदलांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “ही योजना घाई-घाईने फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सुरु केली गेली होती. मोठी आश्वासन दिली, आता गरिबांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे.”
सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची हमी वाढेल, परंतु या योजनेतील बदल राजकीय दृष्टिकोनातून किती परिणामकारक ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.