महाराष्ट्र सरकार लवकरच ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करणार Mazi Ladki Bahin Scheme Beneficiary List Update 2025

3 Min Read
Mazi Ladki Bahin Scheme Beneficiary List Update 2025

Mazi Ladki Bahin Scheme Beneficiary List Update 2025: माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana), जी 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केली होती, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र आता महाराष्ट्र सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तपासून इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना वगळून नवीन लाभार्थी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra to revise Mazi Ladki Bahin Scheme beneficiary list 2025, excluding those availing benefits under other schemes or earning above ₹2.5 lakh annually. Learn the latest updates).

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • माझी लाडकी बहिण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले.
  • सध्या 2.63 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
  • नव्या नियमानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना या योजनेतून वगळले जाईल.
  • इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या सुमारे 20 लाख महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.
  • कुटुंबातील सदस्यांच्या नवावर चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना नवीन लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे.
  • स्वतःच्या नावावर दुचाकी वाहन असलेल्या महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

काय म्हणाल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे?


Aditi Tatkare: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) खरा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी ही कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत. जर अन्य योजनांमधून कमी रक्कम मिळत असेल, तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून उर्वरित रक्कम दिली जाईल. मात्र, महिलेस 1500 रुपयांपेक्षा अधिक लाभ मिळत असल्यास त्यांचे नाव वगळले जाईल,” असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

विरोधकांचा आरोप:


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सरकारवर टीका करत म्हणाले की, “निवडणूक जिंकण्यासाठी घाईघाईने लाडकी बहीण योजना आणली गेली. रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र आता सत्तेत आल्यावर लाभार्थ्यांची तपासणी करून महिलांना अपात्र ठरवून, गरजू महिलांना 2100 रुपये देण्याच्या आश्वानावरून महिलांचे लक्ष विचलित केले जात आहे.”

🔴 हेही वाचा 👉 तीन दिवसांच्या दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त; सोन्याचा आजचा भाव 5 जानेवारी 2025.

सरकारचे स्पष्टीकरण:


महिला व बालविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मते, करदात्यांचा पैसा फक्त गरजूंपर्यंत पोहोचावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, काही लाभार्थ्यांनी योजनेतील त्रुटींचा गैरफायदा घेतल्याचे आढळले आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेत अपेक्षित बदल:


महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा ₹2100 आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याचा निर्णय मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात घेतला जाऊ शकते.

🔴 हेही वाचा 👉 आता लाडक्या बहिणींना निवडावी लागणार एकच योजना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे हा सरकारचा उद्देश असला तरी सरकारच्या निर्णयावर अजूनही राजकीय टीका सुरू आहे.

🔴 हेही वाचा 👉 तुमच्या जवळच्या कोण-कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो मोफत उपचार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now