Majhi Ladki Bahin Yojana Payment : महाराष्ट्रातील 1 कोटिहून अधिक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. जर तुमच्या बँक खात्यात अजूनही ३ हजार रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात महाराष्ट्र सरकारकडून ३ हजार रुपये जमा जमा करण्यात आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये जमा करण्यात आले आहेत. १४ ऑगस्टपासून पैसे जमा करण्यास सुरूवात झाली असून आज १९ ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं आधीच जाहीर केलं होत. पण आज संध्याकाळ पर्यंत ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्या आता याची तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी कशी आणी कुठे तक्रार नोंदवायची त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ‘येथे’ नोंदवा तक्रार
Majhi Ladki Bahin Yojana Complaint Number: अनेक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत. ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांनी 19 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होण्याची वाट पाहावी. आणी 19 रक्षाबंधन ऑगस्ट नंतरही खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर महिला १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकतात. आणि पैसे जमा न झाल्याची तक्रार नोंदवू शकतात. तसेच महिला नारी शक्ती दूत ॲप आणी वेबसाईटवर देखील तक्रारी नोंदवू शकतात. यासोबतच महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदविता येईल. तुमच्या तक्रारीची दखल घेऊन तुमच्या समस्येचे लवकरात लवकरच निराकरण करण्यात येईल. आणी जर तुम्ही पात्र असाल आणी तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नसतील तर अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
महिलांकडून करण्यात आलेल्या तक्रारिंचे सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत 48 तासांच्या आत निवारण करण्यात येईल.