Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. तर आज सर्व पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana: Today, over 2 crore women will receive ₹1500 as the third installment under the scheme. Learn about the latest updates and benefits).
Majhi Ladki Bahin Yojana 1500 Rs Third Installment September: आज रायगडमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे. आणी आजच नवीन अर्ज केलेल्या आणी ज्यांच्या खात्यात यापूर्वी 3000 रुपये जमा झाले होते अशा सर्व महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.
ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी जुलै आणी ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर झाले होते पण काही कारणास्तव त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे पैसे जमा करण्यात आले असून आज सप्टेंबर मध्ये अर्ज पात्र ठरलेल्या व ज्यांच्या खात्यात यापूर्वी 3000 रुपये जमा झाले होते अशा महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आणी ती तारीख यापुढेही वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरनंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आणी ईथुन पुढे ज्या महिन्यात महिला अर्ज करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. आणी 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान 52 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे. तर आज सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येत असून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची संख्या आता जवळपास 2 कोटींच्या घरात जाईल.