Majhi Ladki Bahin Yojana News Today : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तीन हफ्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असून. काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असूनही त्यांच्या बँक खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Special campaign starting from October 2 to resolve payment issues for women under Majhi Ladki Bahin Yojana. Aditi Tatkare directs officers to address pending payment).
25 सप्टेंबर पासून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांनी अर्ज केले असून त्यातील 1 कोटी 87 लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पण अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करता यावेत यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Payment Issue Special Campaign Aditi Tatkare : माझी लाडकी बहीण योजनेबद्दल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकिदरम्यान लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसणे, संयुक्त खाते असणे आणी अन्य काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दि. 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. आणी पैसे जमा न होण्यासंबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
त्यामुळेच जर लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज मंजूर असूनही तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमची अडचण आता लवकरच दूर केली जाईल. आणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.