हे 10 रुपयांचे नाणे आणू शकते तुम्हाला खूप मोठ्या अडचणीत 10 Rs Coin News Today

2 Min Read
10 Rs Coin Issue Trouble Refusal Legal Action

10 Rs Coin News : अनेक शहरांमध्ये तसेच गावांमध्ये दुकानदार आणी छोटे व्यापारी 10 रुपयांचे नाणे घेण्यास टाळाटाळ करत आहेत. काही लोकांकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याने त्याबद्दल लोक वेगवेगळे तर्क वितर्क लावत आहेत. (10 Rs coin refusal can lead to legal trouble. RBI confirms the coin is valid, and refusal to accept it could result in legal consequences under the IPC. Stay informed!).

मुंबई: 10 रुपयांच्या नाण्यांवर वेगवेगळ्या डिझाइन असल्यामुळे 10 रुपयांची नाणी बनावट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. सोशल मीडियावर 10 रुपयांचे नाणे बंद करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या कारणास्तव, काही ठिकाणी लहान दुकानदारांपासून व्यापारी आणि काही बसचालकांपर्यंत सर्वत्र लोक 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकही 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ लागले आहेत.

अफवांना आळा घालण्यासाठी, आरबीआयने अनेक निर्णय घेतले, जसे की राज्य सरकारांना परिवहन कर्मचाऱ्यांकडून 10 रुपयांची नाणी खरेदी करण्याचे आरबीआयने निर्देश दिले. याबाबत जनजागृती पोस्टर्स लावले, सर्व बँकांमार्फत जाहिराती प्रसिद्ध केल्या. पण जनजागृतीसाठी आरबीआयने केलेल्या या प्रयत्नांचा काहीच परिणाम झाला नाही. अजूनही काही दुकानदार आणि व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत आहेत.

पण, 10 रुपयांचे नाणे चलनात असून ते स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते याची बहुतांश लोकांना जाणीव नाही. 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणाऱ्या दुकानदार/व्यापाऱ्यावर काय कारवाई होऊ शकते?…

भारतीय दंड संहिता काय सांगते?

भारतीय दंड संहितेच्या कलम 489A ते 489E अंतर्गत, बनावट नोटा आणी नाणी, अस्सल नोटा किंवा नाणी स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्याने गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या या कलमांतर्गत या गुन्ह्यास दंड, कारावास किंवा दोन्ही ठोठावण्याची तरतूद आहे. जर कोणी तुमच्याकडून 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्यावर आवश्यक पुराव्यासह कारवाई करू शकता.

चलनात असणारे नाणे स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केले जाऊ शकते.  त्याच्यावर भारतीय चलन कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली कारवाई होऊ शकते. या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करता येते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article