10 ऑक्टोबर नाही तर या तारखेलाच जमा होतील पैसे, तुमच्या खात्यात किती जमा होणार? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment 2024 October November Advance

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : 10 ऑक्टोबर पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता दिला जाणार आहे. आणी त्यासोबतच नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता देखील ऍडव्हान्स मध्ये जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हफ्त्याबाबत एक मोठी अपडेट सोमोर आली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana 4th installment will be deposited by 10th October 2024. Eligible women will receive up to ₹7500 in their accounts, including an advance for November).

Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment Date : राज्यातील 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच जमा झाला होता. अनेक महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. अशातच आता 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता जमा करणार असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितल होत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या मंगळवार पासून म्हणजेच 5 ऑक्टोबर पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात चौथ्या हफ्त्याचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आणी 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे दोनीही हफ्ते जमा होतील.

तुमच्या खात्यात किती रुपये जमा होतील?

ज्या महिलांचे जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर झाले होते पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेच नाहीत. अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे एकत्रित 7500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणी ज्या महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा हफ्ता जमा झाला होता त्या महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article