LIC Jeevan Anand Policy Details : जर तुम्ही तुमची बचत एखाद्या सुरक्षित आणी चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका अतिशय चांगल्या स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही केवळ 45 रुपयांची बचत करून 25 लाख रुपये मिळवू शकता. (Invest just Rs 45 daily in LIC Jeevan Anand Policy and secure up to Rs 25 lakh. Get high returns with affordable premiums and additional benefits. Perfect long-term savings plan!).
एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन आनंद योजना (LIC Jeevan Anand Scheme) असे आहे. LIC च्या जीवन आनंद योजनेत तुम्ही कमी प्रीमियम जमा करून जास्त परतावा मिळवू शकता. ही एलआयसीची टर्म पॉलिसी योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बेनिफिट्स देखील मिळतात. एलआयसी जीवन आनंद योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
जर तुम्ही दररोज फक्त सुमारे 45 रुपये वाचवू शकत असाल म्हणजेच दरमहा 1358 रुपये गुंतवण्याची तुमची तयारी असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.
एलआयसीची जीवन आनंद योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही 15 ते 35 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या या योजनेत, तुम्हाला अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि गंभीर लाभ रायडरचे लाभ मिळतात.
जर तुम्ही दररोज फक्त 45 रुपये वाचवून दरमहा 1358 रुपये या योजनेत गुंतवले तर 35 वर्षांनी मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला सुमारे 25 लाख रुपये परतावा मीळेल.
एलआयसीच्या जीवन आनंद योजनेअंतर्गत, जर दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला. तर अशा परिस्थितीत, नॉमिनीला 125 टक्के मृत्यू लाभ दिला जातो.
एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळत नाही. LIC जीवन आनंद प्लॅनमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. मात्र, त्याची कमाल मर्यादा ठरलेली नाही.