दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवून लवकरच 3000 रुपयांपर्यंत करण्यात येणार – मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Payment Increase 3000 Rupees

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असून या योजनेअंतर्गत सध्या देण्यात येणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन लवकरच ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे. (CM Eknath Shinde announces an increase in Majhi Ladki Bahin Yojana payments from Rs 1500 to Rs 3000 per month. Check the latest updates on Maharashtra’s women empowerment scheme).

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 30 लाखहुन अधिक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले असून. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवला जाण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम वाढवून तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. 

रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य शासन राज्यातील महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून महिलांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली आम्हाला पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.

माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना असून लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन लवकरच ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article