Free Ration Date in Maharashtra: भारत सरकार अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत आहे. आर्थिक लाभ देणाऱ्या तसेच अनुदान देणाऱ्या इतरही अनेक प्रकारच्या योजना यामध्ये राबवल्या जातात. यतीलच एक फायदेशीर योजना म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Garib Kalyan Anna Yojana) ज्याद्वारे केंद्र सरकार पात्र लोकांना मोफत रेशन पुरवते. या योजनेत पात्र लोकांना गहू आणि तांदूळ यासारख्या गोष्टी दिल्या जातात ज्या त्यांना शासकीय रेशन दुकानातून मिळतात. रेशनशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये भारत सरकार येत्या 5 वर्षांसाठी लोकांना मोफत रेशन देणार आहे, पण तुम्हाला त्याचा लाभ मिळेल का? चला तर मग जाणून घेऊयात… (Free ration under the Garib Kalyan Anna Yojana extended until 2028! Learn if you’re eligible for the free ration scheme in Maharashtra and who can benefit from this welfare program).
पुढील 5 वर्षांसाठी मिळणार मोफत रेशन
या योजनेअंतर्गत लोकांना मिळत असणारे मोफत रेशन पुढील 5 वर्षे मिळत राहील म्हणजेच तुम्हाला 2028 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सांगितले की, पौष्टिक घटकांनी समृद्ध तांदूळ (फोर्टिफाइड राइस) चा मोफत पुरवठा सन 2028 पर्यंत सुरू ठेवला जाईल. 17,082 कोटी रुपये खर्च करून ही योजना 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुम्हाला याचा लाभ मीळेल का?
भारत सरकारने कोरोनाच्या काळात मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती, परंतु त्याचा लाभ फक्त दारिद्र्यरेषेखालील किंवा त्याखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाच मिळतो. याशिवाय तुमच्याकडे रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो:
- भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर
- विणकर, लोहार, सुतार, झोपडीत राहणारे
- हमाल, रिक्षावाले, फळे व फुले विक्रेते, सर्पमित्र, चिंध्या वेचणारे आणि निराधार इत्यादी या योजनेसाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2028 पर्यंत मोफत रेशनचा लाभ दिला जाईल, ज्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यानुसार मोफत रेशन देण्यात येईल.