3 दिवसात लाडकी बहीण बनण्यासाठी या आहेत अटी, व ही कागदपत्रे आवश्यक Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Documents Apply Deadline 2024

Majhi Ladki Bahin Yojana New Registration : राज्य सरकारने जुलै महिन्यापासून सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या असून पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर महिन्यांचे दरमहा 1500 रुपये याप्रमाणे एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 ही होती पण आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली आहे. म्हणजे आता लाडकी बहीण बनण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3च दिवस शिल्लक आहेत. (Discover the eligibility criteria, necessary documents, and how to apply for Majhi Ladki Bahin Yojana before the extended deadline of 15th October 2024 to receive financial assistance).

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Documents Apply Deadline 2024: तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्ही येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता. सरकारकडून ही मुदत 15 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांमार्फतच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावा लागेल. लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणी योजनेच्या लाभासाठी कोणत्या अटी आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी

  • 1: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • 2: राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील
  • 3: अर्जदार महिलेचे वय २१ ते ६५ वर्ष दरम्यान असले पाहिजे
  • 4: अर्जदार महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे
  • 5: लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 1: आधार कार्ड
  • 2: अधिवास/जन्म प्रमाणपत्र
  • 3: उत्पन्न प्रमाणपत्र
  • 4: अर्जदाराचे हमीपत्र
  • 5: बँक पासबुक
  • 6: अर्जदाराचा फोटो
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now