किती तारखेला मिळणार आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Truth Latest News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. पण खरच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे का? लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस कधी मिळणार आहे? (Is the Diwali bonus under Majhi Ladki Bahin Yojana real? As rumors spread, no official announcement has been made yet by Maharashtra’s government. Stay updated with the latest news).

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus : आज 15 ऑक्टोबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने नवीन अर्ज करण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली असताना अशातच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. सरकार लाडक्या बहिणींना खरच दिवाळी बोनस देणार आहे काय? बोनसचे पैसे किती तारखेला जमा होतील? असे प्रश्न अनेक महिलांकडून विचारले जात आहेत. पण या बातमीमागे नेमकं काय तत्थ्य आहे? ते जाणून घेऊयात…

Majhi Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने जुलै महिन्यात सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधितच घरा-घरात पोहोचली आणी महाराष्ट्रात इतक्या कमी वेळेत ईतकी प्रचंड लोकप्रियता मिळवणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही पहिलीच सरकारी योजना ठरली. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरु झाली आणी पहिल्याच महिन्यात करोडो महिलांनी अर्ज केले आणी पात्र ठरलेल्या करोडो महिलांच्या खात्यात जुलै-ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले. त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आणी त्यानंतरही लाखो महिलांनी अर्ज केले व त्यांच्याही खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले. सरकारकडून दोनदा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आणी अर्ज करण्याची आज 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस कधी मिळणार?

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Truth Latest News : काही दिवसांपूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून भेटवस्तू म्हणून मोबाईल देण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण त्या बातमीमागे कोणतेही तत्थ्य नव्हते. त्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आपल्याला सध्या सर्व सोशल मीडियावार पाहायला मिळत असलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार असलेल्या बातमीमागेही सध्यातरी कोणतेच तत्थ्य नाही. सद्यस्थितीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्रालय यांच्याकडून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच लाडकी बाहीन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर देखील याबद्दल कोणतीही माहिती शेयर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातमीमागे सध्यातरी काहीच तत्थ्य नाही.

अस्वीकरण: | Disclaimer

ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांवर आधारित आहे. आतापर्यंत, माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत दिवाळी बोनसबाबत महाराष्ट्र सरकार किंवा संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा घोषणा झालेली नाही. This news is based on circulating social media reports. As of now, there is no official confirmation or announcement from the Maharashtra government or relevant authorities regarding the Diwali bonus under the Majhi Ladki Bahin Yojana.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article