‘या’ योजनेमार्फत महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यासोबतच महिलांना आर्थिक आणि कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या लखपती दीदी योजनेच्या लाभार्थीचे उद्दिष्ट वाढवून आता दोनवरून तीन कोटी करण्यात आले आहे. या योजनेमार्फत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल जात आहे. तसेच बचतगटातील महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कोण घेऊ शकत या योजनेचा लाभ?
आनंदाची गोष्ट म्हणजे ‘लखपती दीदी’ योजनेसाठी वयाची कोणतीही अट नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिला लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना बचतगटामध्ये सामील व्हावे लागणार आहे. आणी अर्जदार महिला ही कोणत्याही एका महिला बचतगटाची सदस्य असणे बंधनकारक आहे.
लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
• आधार आणि पॅन कार्ड
• पत्त्याचा पुरावा
• उत्पन्न प्रमाणपत्र
• मोबाइल क्रमांक
• बँक पासबुक
• पासपोर्ट आकाराचा फोटो
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला एखादा व्यवसाय दाखवावा लागेल.
- तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात त्याचा आराखडा आणि अर्ज पाठवावा लागेल.
- तुमच्या अर्जाची पडताळणी होईल.
- या योजनेंतर्गत तुम्हाला एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळेल.
या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी महिला कोणत्याही एका महिला बचतगटाची सदस्य असणे बंधनकारक आहे. म्हणजे या योजनेचा लाभ केवळ बचत गटातील महिलाच घेऊ शकतात.