How can I update my Aadhar card in Maharashtra : अनेक वेळा तुमचे नाव, पत्ता, लिंग किंवा जन्मतारीख आधार कार्डवर चुकीची छापली जाते. अशा परिस्थितीत, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुम्हाला तुमचे आधार अपडेट करण्याची संधी देते. त्याबद्दल सविस्तर महिती जाणून घ्या…
सध्या काळात आधार कार्ड आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधार कार्ड असल्याशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. बँकेत खाते उघडण्यापासून ते एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवण्यापर्यंत आपल्याला आधार कार्डाची आवश्यकता असते. अनेक वेळा आधार कार्डवर तुमचे नाव, पत्ता, लिंग किंवा जन्मतारीख चुकीची छापले गेल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुम्हाला तुमचे आधार कार्ड (Aadhar Card Update Online) अपडेट करण्याची संधी देते.
Aadhaar Update Online Free : पण आधारमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडून काही नियम करण्यात आले आहेत. आधारमध्ये एखादी व्यक्ती आपले नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख किती वेळा बदलू शकते यासंबधी काही नियम केले गेले आहेत ते नियम कोणते आणि आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे ते जाणून घेऊया.
आधार कार्डावरील नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख किती वेळा बदलता येईल हे जाणून घ्या
UIDAI नुसार, आधार कार्डधारकांना त्यांचे नाव आधारमध्ये जास्तीत जास्त 2 वेळा बदलण्याची सुविधा दिली जाते. म्हणजेच तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्त दोनदाच बदलू शकता. आणी आधार कार्डावरील लिंग आणि जन्मतारीख केवळ एकदाच बदलता येते.
पण तुम्ही आधार कार्डवरील पत्ता कितीही वेळा बदलू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्ही वीज/पाणी/टेलिफोन बिल, भाडे करार यासारखे पुरावे देऊन किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन तुमचा पत्ता बदलून घेऊ शकता.
आधारमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी, तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या आधार डेटामध्ये कोणतेही बदल करू शकता. तुमचे नाव, पत्ता किंवा लिंग संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, तुमचा नोंदणीकृत फोन नंबर असणे आवश्यक आहे. कारण त्यावर येणाऱ्या ओटीपी शिवाय तुम्ही तुमच्या आधारमध्ये कोणतेही बदल करू शकणार नाही.
आधार पत्ता ऑनलाइन कसा अपडेट करायचा
आधार कार्डमध्ये घराचा पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी, खाली सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- 1- सर्वप्रथम UIDAI myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
- 2- लॉग इन करण्यासाठी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर कॅप्चा कोड भरा आणि Send OTP वर क्लिक करा.
- 3- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉगिन करा.
- 4- यानंतर टॉप मेन्यूमधील आधार अपडेट पर्यायावर जा. त्यानंतर Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
- 5- नवीन पेज उघडल्यावर ॲड्रेस चेंज निवडा आणि Proceed to Aadhaar अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
- 6- यानंतर, तुम्हाला अपडेट करायचा असलेला नवीन पत्ता लिहा.
- 7- आता तुम्हाला पुरावा म्हणून काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- 8- डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल आणि नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.
- 9- यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला 50 रुपये नॉन-रिफंडेबल फी भरावी लागेल.
- 10- एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल आणि त्यानंतर एक-दोन दिवसांत तुमचे आधार अपडेट केले जाईल.
🔴 हे वाचलं का? 👉 Aadhar Card Download Marathi : मोबाईलमध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या.
आधार कार्डवर नवीन पत्ता अपडेट केल्यावर तुम्हाला त्याची माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर मेसेजद्वारे मिळेल. तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे नसल्यास, तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.