Aadhar Card Download Marathi : मोबाईलमध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या

3 Min Read
Aadhar Card Download Marathi

Aadhar Card Download Marathi : प्रत्येक भारतीय नागरिक त्याचे आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतो. तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही कधीही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्डवार रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. 

मोबाईल मध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीशी संबंधित महत्वाचं कागदपत्र आहे. अनेक वेळा गरज असताना आधार कार्ड हातात नसते. अशा परिस्थितीत ओळख पडताळणीसाठी या महत्त्वाच्या कागदपत्रामुळे काम रखडण्याची शक्यता असते. तुमच्यासोबत कधी असे घडू नये म्हणून तुम्ही आधीच तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड करून ठेवू शकता.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड करणे अगदी सोपे आहे, प्रत्येक भारतीय नागरिक त्याचे आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतो. तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा असेल तर गरजेच्या वेळी लगेच आधार कार्ड डाउनलोड करता येते. मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे ते जाणून घ्या…

मोबाईल मध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे 

1: सर्व प्रथम तुम्हाला Google वर UIDAI टाइप करावे लागेल. मग तुम्हाला ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची अधिकृत वेबसाइट’ दिसेल. 

2: या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर (https://uidai.gov.in/hi/) वेबसाइटचे मुख्य पेज दिसेल. 

3: आता तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीतून पुढे जाऊ शकता. 

4: आता तुम्हाला खाली यावे लागेल आणि ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करावे लागेल.

5: आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल. 

6: आता तुम्हाला Send OTP वर क्लिक करावे लागेल. 

7: आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल. 

8: काही सेकंदात आधार कार्ड पीडीएफ फाइल म्हणून डाउनलोड होईल.

9: तुम्ही डाउनलोड केलेली फाईल उघडून वापरू शकता.

🔴 हे नक्की वाचा, तुम्हाला माहित असलंच पाहिजे 👉 आधार कार्ड लॉक केलंय का? आत्ताच जाणून घ्या कस करायच, नाहीतर रिकाम होईल बँक खात.

पीडीएफ फाईल उघडण्यासाठी पासवर्ड काय असतो?

आधार कार्ड महत्वाचा खाजगी दस्तावेज असल्यामुळे ही फाईल केवळ युनिक पासवर्डनेच उघडता येते.  यासाठी आधार कार्डधारकाला त्याच्या नावाची पहिली 4 अक्षरे कॅपिटल आणि जन्म वर्ष वापरून 8 अक्षरांचा पासवर्ड टाकावा लागेल.

 उदाहरणार्थ-

 आधार कार्ड धारकाचे नाव – सागर

 जन्मतारीख- 10 नोव्हेंबर 1998

 आधार पासवर्ड – SAGA1998

  अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये आधार कार्ड डाउनलोड करून ठेवू शकता.

🔴 हे वाचलं का? 👉 Aadhar Card Update Marathi Online: आधार कार्ड अपडेट करण्यापूर्वी हे जाणून घ्या, घरबसल्या ऑनलाइन अपडेट करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article