लाडक्या बहिणी व भावाच नात होणार अधिक दृढ, अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीजेची ओवाळणी Anganwadi Sevika Diwali Bonus Maharashtra 2024

1 Min Read
Anganwadi Sevika Diwali Bonus Maharashtra 2024 Bhaubeej Ovaalni

Maharashtra Government News : राज्य सरकार कडून नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाऊबीजेच्या निमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीजेची ओवाळणी देण्याचाही निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. (Maharashtra government announces ₹2000 Diwali bonus for Anganwadi Sevika and helpers. Strengthen the bond this Bhaubeej with special Ovaalni from the state government).

राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात 5000 रुपये आणी 3000 रुपयांची वाढ करून एक आठवडाही झाला नाही. कालच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेचे अंगणवाडी सेविकांना देय असलेले मानधन लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे.

Anganwadi Sevika Diwali Bonus Maharashtra 2024 : बहिण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या सणानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2000 रुपये भाऊबीजेची ओवाळणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी 40 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यात भाऊबीजेच्या ओवाळणीचे 2000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article