Ayushman Bharat Yojana | आयुष्मान भारत योजना : सध्या लोक विविध सरकारी योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत आहेत. योजनांच्या प्रचारावर सरकार खूप पैसा खर्च करते त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. आयुष्मान भारत योजना नावाची एक योजना आहे ही योजना भारत सरकार चालवते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलते, पण तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागेल. जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवून मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागेल. या योजनेसाठी कोण पात्र आहेत जाणून घेऊयात…
आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?
तुम्हालाही जर आयुष्मान कार्ड बनवून मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, तर आधी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवता येईल की नाही हे जाणून घ्यावे लागेल, त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही ते जाणून घ्यावे लागेल.
आयुष्मान भारत योजनेच्या पात्रता यादीनुसार हे लोक पात्र आहेत
- ग्रामीण भागात राहणारे लोक
- रोजंदारीवर काम करणारे लोक
- असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक
- कुटुंबात एखादी व्यक्ती अपंग असेल तर त्यांना आयुष्मान कार्ड बनवता येईल
- आदिवासी किंवा निराधार असल्यास
- अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक
आयुष्मान भारत योजनेंतर्गत मिळणारे फायदे?
आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र असलेल्यांचे आयुष्मान कार्ड बनवले जाते. तुम्ही या कार्डद्वारे नोंदणीकृत रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता. सध्या या कार्डची मर्यादा वर्षाला ५ लाख रुपये इतकी आहे.
आयुष्मान कार्ड असे बनवायचे?
- जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल.
- सार्वजनिक सेवा केंद्रात जा आणि संबंधित अधिकाऱ्याला भेटा जे तुमची पात्रता तपासतील.
- त्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे द्यावी लागतील.
- यानंतर, कागदपत्रांची पडताळणी करून, तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.
- आणी त्यानंतर काही दिवसांतच तुमचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल.
🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यात कधी जमा होतील पैसे?.